Ticker

6/recent/ticker-posts

पुन्हा नोटबंदी! 2 हजाराची नोट चलनातून बंद, 30 सप्टेंबर पर्यंत नोट बदलण्यासाठी अवधी

पुन्हा नोटबंदी! 2 हजाराची नोट चलनातून बंद, 30 सप्टेंबर पर्यंत नोट बदलण्यासाठी अवधी



रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2000 रुपयांची नोट बंद करणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना तात्काळ प्रभावाने 2,000 रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा वैध चलन (सर्क्युलेशन) राहतील. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील. RBI ने प्रसिद्धीपत्रकात सांगितले की 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. आरबीआयने म्हटले आहे की, 23 मे पासून तुम्ही एकावेळी फक्त 2,000 रुपयांच्या 20,000 रुपयां पर्यंत नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. याशिवाय आरबीआयच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 19 शाखा उघडल्या जाणार आहेत. 


2000 हजाराच्या नोटा कधीपासून सुरू झाल्या



नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारने म्हटलं होतं. यावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत सरकारने विचार न करता हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या