चान्नी येथे भक्ती साधन आश्रम वारकरी प्रशिक्षण
नासीर शेख
पातूर: माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार संजय भाऊ धोत्रे तसेच अकोल्याचे आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर भाऊ सावरकर व तेजरावजी थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष बळीराम सिरस्कार यांच्या प्रयत्नातून चान्नी येथे भक्ती साधना वारकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम कामाचे भूमिपूजन करण्यात आले,
गेल्या पंधरा दिवसापासून ह भ प प्रदीप महाराज ताले यांच्या नियोजनात सुरू असलेल्या वारकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून बालकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प संजय महाराज पाचपोर, अक्षयनंदजी महाराज, प्रदीप महाराज ताले, नारायणजी महाराज, आमदार रणधीर सावरकर, आमदार बळीराम सिरस्कार, तसेच संजय भाऊ मसने, रमणसेठ जैन, चंद्रशेखर पांडे गुरुजी, जगन्नाथजी खरप,चंद्रकांत अंधारे ( टिल्लू पाटील), शंकरराव वाकोडे, कपिल खरप, चान्नीचे सरपंच मनीषा सोनोने, खेट्रीचे सरपंच जहुर खान, मुस्तकीम खान ,आदी भाजपचे बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या