Ticker

6/recent/ticker-posts

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची गारपीटग्रस्त भागात पहाणी

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची गारपीटग्रस्त भागात पहाणी 


प्रशासकीय यंत्रणेला सजग राहण्याच्या सूचना


नासीर शेख पातूर
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पंधरा दिवसात सलग तिसऱ्यांदा धुतल्याने शेतकरी राजा हवालदिल जिल्ह्यात आणि पातूर तालुक्यात दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. पातूर व बाळापूर तालुक्यातील बेलुरा खुर्द व वाडेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषीमंत्री सत्तार यांनी संवाद साधला. तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. 


जिल्ह्यातील अवकाळी व गारपीटने नुकसान झालेल्या बेलुरा खुर्द व वाडेगाव गावांतील पाहणी दौरा आज पार पडला. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, तहसिलदार सैय्यद ऐसामुद्दीन, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक आदीं उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.प्रतिनिधी नासीर शेख पातूर


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या