हृदयद्रावक घटना! जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला- स्थानिक जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 22 मध्ये एका महिलेने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्थानिक डॉक्टरांनी या घटनेची माहिती सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अकोला यांना दिली आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएमसी अकोला येथील गोदावरी राजेश खिल्लारे, वय 25, पंचशील नगर, वाशीम, ही महिला जिचे 4 दिवसांचे बाळ सीसीयूमध्ये दाखल असून ती 15 मार्चपासून आज, 17 मार्च रोजी सकाळी पर्यंत बेपत्ता होती. सफाई कामगार व कर्मचारी संपावर गेले आहेत. पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी करीत आहेत.
आमदार रणधीर सावरकर यांच्या पाँईंट आँफ ईनफाँरमेशन द्वारे सभागृहात शासनास विचारणा.......
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील ढीसाळ व बेजबाबदार कामाच्या पुढे जाऊन तेथे एका महिला रुग्णाने फाशी घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली, म्रुत्यु कधी आणि कसा झाला हे कोड्यात टाकणारे ठरते, या सर्व कारभाराची शासनाने चौकशी व कारवाई करावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी सभागृहात पाँईंट आँफ ईनफाँरमेशन द्वारे मुद्दा उपस्थित करून मागणी केली आहे.
0 टिप्पण्या