खेट्री येथे व्यवस्थापन समिती गठीत
प्रतिनिधी नासीर शेख
खेट्री :पातूर तालुक्यातील खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची व्यवस्थापन समिती बुधवार दि.१५ मार्च रोजी गठीत करण्यात आली, यामध्ये अध्यक्षपदी शेख वाजीद तर उपाध्यक्षपदी इब्राहिम खान, यांची अविरोध निवड करण्यात आली, गेल्या काही वर्षापासून एकच समिती गठीत असल्याने नवीन समिती गठीत करण्याची मागणी पालकांनी रेटून धरली होती, अखेर बुधवार रोजी व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली, यावेळी सरपंच जहूर खान मुख्याध्यापक मो. आरीफुररहेमान पोलीस पाटील भगवंता ताले सर्व शिक्षक व बहुसंख्या पालक उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या