मायाताई ईरतकर सावित्रीची लेक पुरस्काराने सन्मानित
प्रतीनीधी- संदीप देशमुख
अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या तथामहात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा समाजसेविका माया इरत कर यांना नुकताच सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र ,श्रमिक उद्योग समूह नवी मुंबई ,बाबासाहेब ढोणे मेमोरियल ट्रस्ट कळवा ठाणे, श्री. संजय माळी अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्ताने मुंबई येथे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा 11 मार्च 2023 ला मुलुंड हायस्कूल मैदान येथे पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले मा. डॉ. श्रीकृष्ण ढोणे , मा. दशरथ कुळधरण ,मा. रामदासजी डोके, मा. राजेंद्रजी आंडे , मा. डी .के .माळी यांच्या प्रमुख उपस्थिती सौ माया ताई ईरतकर ,समता परिषद जिल्हा अध्यक्ष अकोला , यांना डॉ. श्रीकृष्ण ढोणे यांच्या हस्ते " क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सन्मान पत्र व "सन्मान पदक " देऊन सन्मानित करण्यात आले .विविध सामाजिक संघटनेची जुळणाऱ्या माया ताई ह्या एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना आतापर्यंत अनेक सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे हे विशेष.....
0 टिप्पण्या