अकोला जिल्हयातील शहीद जवांनाचे कुटुंबास शिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेतुन निधीची तरतुद करण्याची मागणी
जिल्हातील अनेक तरुण सेनेमध्ये देशसेवेकरीता तैनात असुन त्यापैकी बरेच जवान देशसेवा करीत असतांना देशासाठी शहीद झालेले आहेत. अश्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आगामी जिल्हा नियोजन समितीचे सभेमध्ये विषयसुचीवर विषय घेवुन जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधीची तरतुद उपलब्ध करुन देण्यात यावी.
१. शहिद जवानांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकरुन त्यांचे शैक्षणीक शुल्क अदा करण्याकरीता जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधीची तरतुद उपलब्ध करण्यात यावी.
२. शहिद जवानांची विधवा पत्नी किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्यास रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधीची तरतुद उपलब्ध करण्यात यावी.
३. शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनामार्फत पेट्रोल पंप, गॅस एजन्सी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत विशेष निधीची तरतुद करण्यात यावी.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या