महानगरात मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात
निःशुल्क अपघाती ११५० विमा पत्रक वाटप; मराठी संगीत रजनीने भरला रंगमंच
। अकोला, दि. ९ ।
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांचा वाढदिवस महानगरात
बाळासाहेबांची शिवसेना अकोला
जिल्हातर्फे जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून नि: शुल्क अपघाती विमा पत्रक वाटप करण्यात आले. मराठी गीत गायनाने संगीत
रजनी कार्यक्रम तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने १ लाख रुपयांचा निःशुल्क अपघाती विमा पत्रक देण्यात आले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन संपर्कप्रमुख तथा उपनेते गोपीकिशन बाजोरीया व आ. विप्लव बाजोरीया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील हे होते.
या कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हा प्रमुख योगेश बुंदेले, सरचिटणीस राजेंद्र नेरकर, उपजिल्हा प्रमुख राजेश चव्हाण,गजानन रोकडे, शहर प्रमुख कमल खरारे,शहर प्रमुख अतुल येळणे, प्रा. निखील नाळे नवीन पाली, मयुर गुजर, वैभव राऊत यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल नागापुरे यांनी केले. संगीत रजनी कार्यक्रमाने प्रेक्षकांनी प्रथमच महानगरात मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना अनुभवला. तसेच नागापुरे यांनी मुख्यमंत्री यांनी केलेल्या राज्याच्या विकासाबद्दल माहिती दिली. यावेळी शहरप्रमुख योगेश अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, युवा सेनेचे राज यादव, युवा सेना सरचिटणीस चेतन थामेद, युवा सेना शहरप्रमुख विकीसिंग बावरी, रवी देशमाने, अविनाश पुनेरे, प्रफुल्ल रोकडे, प्रतीक सापधरे, स्वराज ठाकूर, सोनू इंगळे आदी उपस्थित होते. असे राजू नेरकर, जिल्हा सरचिटणीस, अकोला यांनी अवगत केले.
0 टिप्पण्या