Ticker

6/recent/ticker-posts

बहुजनांची आई त्यागमुर्ती माता रमाई यांना अभिवादन

बहुजनांची आई त्यागमुर्ती माता रमाई यांना अभिवादन 



माता रमाई म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी शोषलेल्या गरिबीच्या चटक्यांना, इच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणे अशक्य आहे. म्हणून त्यांच्या जयंती निमित्त 7 फेब्रुवारी रोजी निर्मल ज्ञान बुद्ध विहार डोंगरगाव येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त धम्म उपासक उपासिका,बुद्ध पंच मंडळ, विशाखा महिला मंडळ, सिद्धार्थ नवयुवक मंडळ यांनी रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे बुद्ध उपासक उपसिका यांनी सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. व शालेय विद्यार्थ्यांनी चिमुकल्यांनी निर्मल ज्ञान बुद्ध विहार डोंगरगाव येथे माता रमाई यांच्या जयंती निमित्त आपल्या मधुर वाणीतुन बहुजनांची आई माता रमाई यांनी केलेला त्याग आपल्या भाषणातून व्यक्त केला. व त्याचप्रमाणे विनोद तायडे व त्यांचे सहकारी बुद्धप्रकाश बोरखडे यांनी आपल्या अप्रतिम वाणीतुन, मधुर अश्या आवजातून माता रमाई यांचे गीत सादर केले. 


या वेळी गावातील बुद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते. तसेच धम्म उपासक मधुकर इंगळे यांनी माता रमाई यांच्या जयंती कार्यक्रमाचे संचालन केले व आभार मानले. माता रमाई यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धार्थ नवयुवक मंडळ डोंगरगाव व बुद्ध पंच मंडळ, विशाखा महिला मंडळ, भुषण जामणिक, आदर्श खंडारे, किशोर इंगळे, सचिन तायडे, प्रशिक इंगळे,कपिल शिरसाट, अजय इंगळे, युवा समाज सेवक राहुल खाडे आदींनी परिश्रम घेतले..


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या