Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते समाधानजी गाढे, एक अजरामर व्यक्तिमहत्व

काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते समाधानजी गाढे, एक अजरामर व्यक्तिमहत्व


सौदळा- सौंदळा गावाला ज्यांचा सर्वच बाबतील अभिमान होता असे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. समाधानजी मोतीरामजी गाढे, त्यांचा जन्म ३ जुलै १९५० ला एका गरीब छोट्याशा शेतकरी कुंटूबात झाला. लहाणपणी गाढे परिवाराची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती त्यामुळे समाधानजींना फारसे शिक्षण घेता आले नाही. लहानपणासूनच त्यांना कष्ट करण्याची सवय होती. परिस्थितीचे चटके बसल्यामूळे त्यांनी जीवनभर कोणतेच व्यसन केले नाही. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या जीवनाचे सुत्र होते. अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हे सूत्र पाळले. प्रामाणिकपणे कष्ट करून आपले कुटूंबाचे पालक पोषण केले. असाच त्यांचा जीवनक्रम आयुष्यभर पुरविला. तरुण वयातच त्यांना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे आकर्षण वाटू लागले आणि पूढे ते कांग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले आणि यामुळेच त्यांना गावातील लोक त्यांना 'कामराज' या नावाने संबोधू लागले. त्यांच्या पक्षनिष्ठतेमुळे विरोधकही सुद्धा त्यांचा आदर करत असत. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे सौंदळा ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून काम मिळाले, तेही काम त्यांनी अतिशय निष्ठेने व जबाबदारीने पार पाडले. त्यांच्या हस्तक्षरात लिहिलेल्या नोंदी ग्रामपंचायत कार्यालयात आजही अचूक पाहावयास मिळतात. अतिशय बेताच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या लहान मुलाला प्राध्यापक बनविले. त्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढत गेला. स्व. समाधानजी हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे, दैनिक वर्तमान पत्राचे नियमीत वाचक, काँग्रेस पक्षाची भूमिका निर्भिडपणे विनम्रपणे मांडणारे, निर्व्यसनी, उच्च विचारसरर्णी असणारे, कष्टाळू, विश्वासाई, व्यक्तिमत्व होते.


 अनेकांना आदर्श ठरणाऱ्या अशा एकनिष्ठ कांग्रेस कार्यकर्त्यांचे २४ डिसेंबर 2022 ला दुःखद् निधन झाले. त्यांचे मागे असलेले त्यांचे दोन्ही मुले व एक मुलगी आपल्या वडिलांनी केलेल्या संस्काराची जाण ठेवून आपापले गृहस्थाश्रम यशस्वीपणे सांभाळल आहेत. स्व. समाधानजी गाढे यांच्या अस्थिचे विसर्जन त्यांच्या मुलांनी गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे अतिशय साध्या पद्धतीने केले असून तो एक आदर्श पाठ अनेकांना दिला आहे.. गाढे कुटूंबाने अशा या दुःखद प्रसंगी गाढे कुटुंबांवरव शोककळा पसरली. यामधून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांना प्रदान करो. स्व. समाधानजी गाढे यांना शांती लाभो. त्यांच्या आदर्श जीवन प्रणालीमुळे ते अजरामर झालेत असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या