Ticker

6/recent/ticker-posts

मराठा महासंघ महिला आघाडी तर्फे जिजाऊ जयंती साजरी

मराठा महासंघ महिला आघाडी तर्फे जिजाऊ जयंती साजरी


अखिल भारतीय महिला मराठा महासंघ अकोला महानगर व जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा ठाकरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन महासंघाचे उपाध्यक्ष विनायकराव पवार, विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, सुभाष मामा म्हैसने, मनोहर मामा हरणे, मधुकरराव देशमुख, माजी नगर सेविका देवर्षी ठाकरे, शोभाताई गरड, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक महानगर अध्यक्षा कल्पना बिडवे यांनी केले यावेळी पदाधिकारी व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. जेसीआय अकोला न्यू प्रियदर्शनी मध्ये सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा संघटिका सिंधुताई पवार यांचा या वेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


 कार्यक्रमाला संजय सूर्यवंशी,श्रीकांत सरोदे, प्रदीप लुगडे, नरेश सूर्यवंशी, रमेश कदम, राजेश देशमुख, अरुण खोटरे, रुपाली वाकोडे, लता मते, गायत्री वडोळे, वैशाली कदम, निशा पवार, राखी पटेकर, अंजली लोहकरे, रश्मी पटेकर, छाया पवार, वंदना देशमुख, स्नेहा बारस्कर, सौ. सरोदे, मेघना टाले, लता गावंडे, चंदा जरांडे, माया पवार, शोभा बोरकर, रेखा शेळके, मालती गोंडचवर, सौ. पागृत, शिवानी पवार, सौ अग्रवाल आदी उपस्थित होते. अशी माहीती सचिन पाटील गोमासे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सोशल मीडिया अकोला यांनी दिली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या