Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रं 4 रेल्वे गेट ते खरप फाट्या पर्यंतचा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

प्रभाग क्रं 4 रेल्वे गेट ते खरप फाट्या पर्यंतचा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी 



 अकोला प्रभागक्रं 4 येथील रेल्वे गेट ते खरप फाट्यापर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशा चाळणी झालीली आहे त्यामुळे या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्रास व कसरत करावी लागत आहे. त्यांना मणक्याचे आजार जडत आहेत, तसेच खड्ड्यामुळे रस्त्यावर वारंवार लहान मोठे अपघात घडून नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार अकोला मनपा आयुक्त यांना निवेदने देऊन तसेच या रस्त्यासाठी तेथील नागरिकांनी आंदोलने करून सुद्धा अद्याप पर्यंत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा यापूर्वी सदर रस्त्याची दुरुस्ती करणे बाबत निवेदन सादर करण्यात आले आहेत. तरी संबंधित अधिकारी यांना सदर रस्त्याची पाहणी करून रस्ता त्वरित दुरुस्त करणे बाबत सूचित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.  या परिसरातील नागरिकांची होणारा त्रास व जीव घेणे त्रासातून मुक्तता करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी शंकरराव इंगळे, शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तथा जि प सदस्य मनोहर बनसोड,महानगर महासचिव वंचित बहुजन आघाडी अमोल कलोरे संजय वानखडे, पुरुषोत्तम वानखडे महानगर प्रसिद्धीप्रमुख आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या