धधक्कादायक!! आमदार बच्चू कडू यांचा अपघात
चांदूर बाजारचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. अमरावती शहरात सकाळी 6 च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला आणि उजव्या पायाला मोठा मार लागला आहे. त्यांना तात्काळ अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याची माहीती आहे. सुदैवाने बच्चू कडू यांचा अपघातात बचाव झाला आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यात अनेक राजकीय नेत्यांचे अपघात झाले आहेत. भाजप आमदार जयकुमार गोरे यांची गाडी नदीत कोसळली होती. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यातच 2 दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचाही अपघात झाला होता, गेल्या काही दिवसांतील अपघाताच्या या घटना पाहता आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी त्यांनी चहात्यांना आपल्याला सध्या विश्रांतीची आवश्यकता असल्यामुळे भेटावयास येऊ नये असे ट्विटरवरून कळविले आहे.
0 टिप्पण्या