दाना बाजारात अकोला महापालिकेची पुन्हा अतिक्रमण कारवाई
अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ दाना बाजार येथील अतिक्रमण काढण्याची कारवाई महापालिकेने आज पुन्हा केलीय..या कारवाई दरम्यान काही वेळासाठी तणावाचे वातावरण तयार झाले होते..येथील व्यापाऱ्यांनी महापालिकेला अतिक्रमण काढण्यास विरोध केला तर महापालिकेला कोणते आदेश नसल्याचा आरोप यावेळी व्यापाऱ्यांनी केलाय..तर महापालिकेच्या कारवाई विरोधात नारेबाजी करत अतिक्रमणाला काही काळ थांबवले..हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाचे कोणतेही आदेश नसतांना महापालिका याचा उल्लंघन करत अतिक्रमण काढत असल्याचा असरोपही व्यापाऱ्यांनी केलाय..
महापालिकेला पोलीस बंदोबस मिळाल्याने आज दाणा बाजाराचे पक्के अतिक्रमण पाडण्यात आलेय.. बाजारपेठेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत तर अनेक महिलांनी या ठिकाणी आंदोलन सुद्धा केले...
0 टिप्पण्या