Ticker

6/recent/ticker-posts

आदित्य ठाकरे यांनी घेतला मुरली टपरीवर चहाचा आस्वाद

आदित्य ठाकरे यांनी घेतला मुरली टपरीवर चहाचा आस्वाद


अकोला शहरात कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे चहाटपरी. अकोल्यातील एक चहाविक्री करण्यारा अनोखा व्यक्ती असून, तिथे आदित्य ठाकरे यांनी नेहरू पार्क जवळील मुरली चहावाला यांच्या दुकानात भेट दिली. ठाकरे यांनी मुरली सुर्वे यांचे स्वागत केले. मुरली सुर्वे यांच्या दुकानात सात ते आठ मोठे फोटो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावलेले आहेत. यांच्या चहा सोबत असलेले उद्भव ठाकरे यांच्या शिवसेने विषयी असलेले प्रेम खुद्द आदित्य ठाकरे यांना देखील आवरले नसून, आज अकोला आगमन होतच त्यांनी प्रथम या चहावाल्या कट्टर शिवसैनिकाची भेट घेऊन त्याला स्वतःचा हाताने पुष्पहार घालून सत्कार केला. अकोला शहरातील नेहरू पार्क येथील मुरलीधर माधवराव सुर्वे याचा चहा विक्रीचा व्यवसाय हा सलग 25 वर्षा पासून सुरु आहे. जशी मुरली म्हणजेच बासरीचे मधुर स्वर असतात त्याच प्रमाणे मुरली याच्या चहाची चव देखील तेवढीच मधुर आहे. हा मधुर आस्वाद घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनाही अनावर झाले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या