विशेष पथकाची कळंमेश्वर शेत शिवारात येथे अवैध रित्या गावठी हात भट्टी वर धाड
आज १९ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने विशेष पथक अकोला शहरात अवैध धंद्यावर रेड पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी मिळाली असता एक इसम कळंबेश्वर शेत शिवारात आपल्या शेतात अवैधरित्या गावठी हात भट्टी चालवीत असून मोहा गावरान दारू पाडून विक्री करीत आहे.
तेथे पाहणी असता एक इसम हरीभाऊ नरसिंह सोळंखे वय ५४ रा नवीन प्लॉट चांदुर, हा आपल्या कळंबेश्र्वर शेत शिवारातील शेतात अवैध रित्या गावठी हात भट्टी चालवीत असून मोहा गावरान दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्या जवळून २० लिटर दारू व सडवा मोहा १८० लिटर व इतर दारू गाळण्याची साहित्य असा एकूण ५०,००० रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध पो स्टे जुने शहर येथे महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाही माननीय पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकांनी आज सकाळी 08।00 वा केली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या