Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पवित्रा लम्पी आजारात दगावलेल्या जनावरांच्या मालकांना तात्काळ नुकसान भरपाई द्या -सुनिल सरदार (तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक पवित्रा लम्पी आजारात दगावलेल्या जनावरांच्या मालकांना तात्काळ नुकसान भरपाई द्या -सुनिल सरदार (तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी


वृत्तसेवा : प्रेमकुमार गवई

मुर्तिजापूर :१३ , सध्या जिल्हाभर जनावरांवर लम्पी आजाराने थैमान घातला असुन या आजारांमध्ये अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व शेतीकामात महत्वाची भुमिका हि या जनावरांच्या माध्यमातून निभावल्या जाते. पण जिल्हाभर जनावरांवर लम्पी नावाच्या या आजाराने ग्रासले असुन त्यात अनेक जनावरे हि दगावली आहेत. अगोदरच शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढावले असुन. अतीवृष्टीमुळे शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत. त्यात जोडधंदा म्हणून शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील जनावरांच्या माध्यमातून संसार चालवण्यासाठी थोडी मदत होत होती पण आता या लम्पी आजाराने तेही हिसकावली आहे. या आजारांमध्ये जनावरें मोठ्या प्रमाणात दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे अश्या संकटात शासनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. 


दगावलेल्या जनावरांच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना जनावरांच्या बाजारभावाने मदत मिळावी व आजारग्रस्त जनावरांचे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावी जेथे मनुष्यबळ कमी पडते तेथे जनावरांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत हि तात्काळ करण्यात यावी ह्यासाठी आज दि. १३ ला . वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यांना निवेदन देण्यात आले व सदर निवेदनाची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .यावेळी तालुका अध्यक्ष सुनील भाऊ सरदार ,  महासचिव अक्षय जोंगळे , संघटक संजय  रौदळे , कोषाध्यक्ष गौरव मेसरे , तालुका प्रसिध्दी प्रमुख अतुल नवघरे , तालुकाध्यक्ष महिला आघाडी लक


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या