Ticker

6/recent/ticker-posts

नवनीत राणा यांच्याविरुद्ध पोलिसांकडे एम.आय.एम.ची तक्रार!

नवनीत राणा यांच्याविरुद्ध पोलिसांकडे एम.आय.एम.ची तक्रार!


अमरावती येथील एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी ते प्रकरण लव्ह जिहाद असअसल्याचा खोटा आरोप केला आहे. यातून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अकोला एम.आय.एम. यांनी करीत, नवनीत राणा यांच्याविरुद्ध १३ सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांना निवेदनातून केली आहे. ७ सप्टेंबर रोजी खा. नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालून एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा आधार घेत हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप करीत होत्या.  

बाईट- जावेद पठान
दोन समाजात पाय रोवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांशी गैरवर्तन केले, यासाठी अकोला एमआयएमने पोलीस अधीक्षक कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आणि अतिरिक्त एसपी मोनिका राऊत यांना निवेदनातून कारवाई करण्याची मागणी केली, अशा लोकांवर कारवाई करावी अन्यथा असे लोक गलिच्छ राजकारण करून समाजात तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भिन्न धर्मीय असल्याचा युवकाने लव्ह जिहाद अंतर्गत मुलीला पळवून नेल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी दोन धर्मांतील लोकांना भडकावत असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या