शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला माजी विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी प्रा. भारसाकळे
अकोला -- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित बाभूळगाव - अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे यांची निवड करण्यात आली आहे. या माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक तथा विद्यमान अध्यक्ष प्रा . शशीकांत मोरे यांनी आज महाविद्यालय परीसरात ही घोषणा केली. प्रा. मोरे यांनी माजी विद्यार्थी असलेल्या प्राध्यापक वृंदांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात प्रा. गजानन भारसाकळे यांचे अभिनंदन करून व त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा प्रदान करून नवकार्याचा कारभार सोपविला. प्रा. भारसाकळे यांनी सन 1991 या शैक्षणीक वर्षात या महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद सुद्धा भूषविले आहे. ते कबड्डी या खेळाचे राज्यस्तरीय खेळाडू म्हणून परिचित असून दर्वापूरच्या नेताजी क्रीडा मंडळ बनोसा तथा कौलखेड - अकोला येथील माजी क्रीडाराज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांच्या जय जगदंबा क्रीडा मंडळाचे खेळाडू आहेत. दर्यापूर तालुक्यातील बेलोरा या जन्मगावाचे अविरोध सरपंच म्हणून त्यांनी अतीशय यशस्वीपणे कामगिरी बजाविली आहे.
शासनाच्या जि .प.समाज कल्याण विभाग अमरावती च्या वृद्ध साहित्यिक व कलावंत शासकीय मानधन समितीचे पाचवर्षे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. प्रा. गजानन भारसाकळे हे दर्यापूरच्या सुप्रसिद्ध गाडगेबाबा मंडळ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.या संस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरीय आर्ईमहोत्सव , आंतरराष्ट्रीय पातळीवर पद्मभूषण डॉ विजय भटकर कार्यगौरव सोहळा , शिक्षण दिपावली , संत अच्युत महाराज साहित्य संमेलन , जलजागृती अभियान , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपक्रमांना यशस्वीपणे राबविले आहे. या कार्याची नोंद घेऊन प्रा. भारसाकळे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९ या वर्षातील संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित केलेले आहे . पर्यावरण सेवा कार्यासाठी सुद्धा त्यांना विविध सामाजिक तथा शैक्षणीक संघटनांद्वारे वेळो वेळी गौरव प्राप्त आहे. त्यांचे प्रमुख मार्गदर्शनात दर्वापूर तालुक्यतील माहूली ( धांडे ) येथे मागील चार वर्षांपासून गोरक्षणची स्थापना करण्यात आली असून गो सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील उच्च शिक्षण पदवी प्राप्त प्रा. गजानन भारसाकळे यांच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण देश -विदेशातील माजी विद्यार्थी यांनी सहर्षाने अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेला ३९ वर्षे पूर्ण झाली असून महाविद्यातील माजी विद्यार्थी संख्या ही दहा हजारांहून अधिक आहे. या प्रसंगी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी या नात्याने प्रा. दुश्यन झामरे , सुधीर ढोमणे , प्रा. अमित गावंडे , प्रा. प्रेमसागर भानावत , प्रा. पी. एम. राऊत, प्रा. शशीकांत ठाकरे , प्रा. आनंद ताथोड यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटना प्रेरणा दायी उपक्रमांसाठी कटीबद्ध ----- प्रा. गजानन भारसाकळे
माजी विद्यार्थी संघटना अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारून या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. गजानन भारसाकळे यांनी या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारचे टेक्नीकल ट्रेनिंग , इन्डस्ट्रीयल सहली , इंजिनिअरींग विषय तज्ञ मार्गदर्शन तसेच रोजगार निर्मिती करीता देश विदेशात कार्यरत असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्याचे आश्वस्त केले. तसेच महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विविध बाबींकडे ही संघटना सक्षम माजी विद्यार्थी यांचे लक्ष केंद्रीत करून महाविद्यालयाला उच्च स्तर प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहील.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या