वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी खेंडकर ज्ञानगंगेत शिक्षक दिनाचे केले सुंदर नियोजन
स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून खेंडकर ज्ञानगंगेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षक दिन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शिक्षक स्वयंअध्ययनाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने तयार करण्यात आली यावेळी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वर्ग पाचवी ते वर्ग दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर भाषणातून प्रकाश टाकला. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी भाग घेतला होता. स्वयंअध्ययनाचा कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला. दुपारच्या सुट्टीनंतर विद्यालयाच्या मैदानावर शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेडकर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार अर्पण व पूजन केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन अभिवादनानंतर शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अंजली निकामे, व पल्लवी निमजे यांनी केले.. आभार पियुष दामोदर याने मानले. कार्यक्रमाचे आयोजन तथा नियोजन वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी विषणुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर, शाळेच्या कोशाध्यक्ष मृणालीनी खेंडकर, सहसचीव अस्मिता खेंडकर तर शिक्षक प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत व गोपाल वानखडे, सुरेश सुरत्ने, प्रशांत काळे, कांचन वानखडे, उषा जगदाळे, आशा हिवरकर, मनीषा अंभोरे, मीरा सरदार, भारती लांजेवार, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकवर्ग यांची उपस्थित होती.
0 टिप्पण्या