शिवणी, शांतीनगर येथील नळाची पाईप लाईन फुटली, प्रशासनाचे दुर्लक्ष
अकोला (प्रतिनिधी) स्थानिक शहरालगत असलेल्या शिवणी येथील शांतीनगर मधील नळाची पाईपलाईन गेल्या एक महिन्या पासून फुटली आहे येथील नॅशनल हायवे रोडचे काम चालू असून रस्त्याचे रुंदीकरण करत असताना जेसीबीच्या खोतकामामुळे पाईप लाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे येथील नागरिक कामगार वर्ग असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी क्षेत्रीय दक्षिण झोन अधिकारी मनपा अकोला यांना निवेदन देऊन होणाऱ्या गैरसोई संदर्भात त्वरित कार्यवाही न केल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे अकोला तालुका संघटक प्रविण डि. वाहुरवाघ यांच्यासह येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे
0 टिप्पण्या