रशियात अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरणाचा अकोल्यात जल्लोष
मॉस्को मधील रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला ही निश्चितच गौरवाची बाब आहे. आता राज्य सरकारने जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्राकडे "भारतरत्न" पुरस्कारासाठी प्रामाणिक पाठपुरावा करून अण्णाभाऊंवरची निष्ठा सिद्ध करावी, अशी मागणी अण्णाभाऊ साठे संघटनेतर्फे जोर धरत आहे.
@Dev_Fadnavis
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण 14 सप्टेंबरला रशियाची राजधानी मास्को येथे महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे रशियातील मास्को शहराच्या मध्यवर्ती परिसरात काही आंतरराष्ट्रीय विभूती सोबत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा जगातील मातब्बर मंडळीच्या विशेष उपस्थितीमध्ये शानदार सोहळा आज पार पडला आहे ही बाब समाजासाठी गौरवशाली आहे त्याचा आनंद म्हणून अकोला शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृती व्यक्त करण्यासाठी समस्त मातंग समाज अण्णाभाऊ साठे चौक रेल्वे स्टेशन अकोला येथे उपस्थित राहून आनंदा साजरा करण्यात आला.
0 टिप्पण्या