Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सावरकर यांचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची नियुक्ती बद्दल भाजपा कार्यालयात सत्कार

आमदार सावरकर यांचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची नियुक्ती बद्दल भाजपा कार्यालयात सत्कार 


संघटना ही जनतेच्या समस्या निराकरणााठी प्रभावी साधन आहे.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्मता मानवता वाद च्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संकल्पनेतून देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,जे पी नद्दा,अमित शहा,देवेंद्र फडणवीस,नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे,संजय धोत्रे यांनी संघटना आणि सत्ता यांच्या मधतील दुवा म्हणून सरचिटणीस पदाची जवाबदारी दिली.महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांचे आशीर्वाद,श्रम,विश्वास,स्नेह,प्रेमाच्या बळावर यशस्वी पार पाडू असा विश्वास नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची नियुक्ती झाल्यानंतर प्रथम अकोला आगमन प्रसंगी अकोला महानगर व ग्रामीण भाजपा तर्फे भाजप कार्यालय डॉ.बाबासाहेब टोपले सभागृहात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल हे होते.यावेळी आ. गोवर्धन शर्मा,आ.हरीश पिंपळे,आ.वसंत खंडेलवाल,अनुप धोत्रे,बळीराम सिरस्कार, श्रावणजी इंगळे,शंकरराव वाकोडे,माधव मानकर,रमेश अप्पा खोबरे,अक्षय गंगाखेडकर,संजय जिरपुरे,संजय गोडा,संजय गोटफोडे,जयंत मसने,चंद्रशेखर पांडे गुरुजी, देवाशिष काकड,संतोष पांडे,अमोल गोगे,राजेंद्र गिरी,गणेश अंधारे,अर्चना मसने,अश्विनी हातवळणे,सुमन गावंडे,अनिता चौधरी,आरती घोगलिया,श्रीकृष्ण मोरखडे,गिरीश जोशी,मोहन पारधी,अक्षय जोशी उमेश गुजर,अभिजीत बांगर,अनिल गावंडे,राजेश बेले,रवी गावंडे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या