कार्यकर्ते पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यासाठी मंडळांना भेटी देत असल्याचे प्रतिपादन- आ. रणधीर सावरकर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वाड्यातून केली गणेशोत्सवाला सुरूवात
अकोला समाज समाज परिसर तसेच देशभक्ती संस्कार परंपरा, धार्मिक अध्यात्मिक सोबत एकमेकांविषयी प्रेम बंधूभाव निर्माण करणारा गणेशोत्सव बुद्धी सोबत प्रत्येक गोष्टीचे महत्त्व हिंदू संस्कृतीत असल्याचे प्रत्यय असणारा असून राजराजेश्वर नगरी गणेशोत्सवासाठी अकोला पंचकोशीमध्ये प्रसिद्ध असल्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह व त्यांच्या भक्ती, तसेच सुप्त गुणांना वाव देणाऱ्या उत्सवाला नाविन्यपूर्ण कार्याला नमन करणे हे कर्तव्य व चांगल्या गुणांचा आदर सन्मान करणे ही संस्कृती असल्यामुळे आपण मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या अभिनंदन करण्यासाठी मंडळांना भेटी देत असल्याचे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर जिल्हा भाजपा अध्यक्ष यांनी केले.
स्वतंत्रपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी वाड्यातून सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आज देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्ष झाले तरी देखील अती उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. अमृत महोत्सव निमित्त अकोला शहरात व जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने युवाशक्ती मातृशक्ती यांनी गणेश स्थापना चांगले देखावे सादरीकरण करून समाजाला दिशादर्शक कार्य केल्याची ही आमदार सावरकर यांनी सांगून सर्व महानगर व जिल्ह्यातील मंडळाचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. आमदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने अनुप धोत्रे यांनी मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी
स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनाचा उद्देश घेऊन सुरू झालेला हा लोकोत्सव आजही समाजात एकी निर्माण करत नवनवीन संकल्पना समाजासमोर मांडताना दिसून येतो आज याच अनुषंगाने अकोला पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी भाजप अकोला महानगर पूर्व मंडळ तर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मान कार्यक्रमात अध्यक्ष भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल होते यावेळी गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी अनुपजी धोत्रे,देवाशिष काकड,नगरसेवक अजय शर्मा,सागर शेगोकार,आरतीताई घोगलिया,जान्हवीताई डोंगरे,रुपेश जयस्वाल,अनिल मुरूमकर,विजय जयपिल्ले,योगेश मानकर,आकाश ठाकरे,अभिजीत कडू,केशव हेडा,अक्षय जोशी,मोहन पारधी प्रकाश घोगलिया,संतोष डोंगरे आदी पक्षाचे पदाधिकारी व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या