Ticker

6/recent/ticker-posts

'हर घर को नल से जल' अभियान अंतर्गत अकोल्यातील प्रत्येक गावात शहरात मिळणार निर्मल पाणी

'हर घर को नल से जल' अभियान अंतर्गत अकोल्यातील प्रत्येक  गावात शहरात मिळणार निर्मल पाणी




अकोला –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावा व आरोग्य चांगला राहावा यासाठी 2024 पर्यंत घरघर पाणी स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीने गाव व शहरातील प्रत्येक घरापर्यंत 'हर घर को नल से जल' अभियान अंतर्गत निर्मल पाणी पोहोचवण्याच्या दृष्टीने वेगळा मंत्रालय निर्माण करून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला. अकोला लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी या योजना अंतर्गत जिल्ह्यातील ७८९ गावांमध्‍ये एकुण ४१९ कोटी ७३ लक्ष रूपये खर्च करून केंद्र सरकारच्‍या जलजिवन मिशन योजने अंतर्गत नागरीकांना पिण्‍याकरीता स्‍वच्‍छ पाणी मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने जलशक्‍ती मंत्रालय भारत सरकार द्वारा जलजिवन मिशन योजना मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करून  या योजनेचे उदिष्‍ट २०२४ पर्यंत हर घर नळाद्वारे पाणी पुरविण्‍याचे उदिष्‍ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी प्रयत्न सुरू केले असून खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी या दृष्टीने पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील प्रत्येक गावांना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व बहुतांश गावांमध्‍ये उन्‍हाळ्यामध्‍ये नागरीकांना पाणी समस्‍या जाणवत होती. त्‍यामध्‍ये अनेक गावांच्‍या मातृशक्ती यांना कसरत करून सरकारी नळावर खाजगी विहीर दुरवरचे तलाव यामधून पाणी पिण्‍यासाठी आणावे लागत होते. शुध्‍द पाणी पिण्‍याकरीता या योजनेद्वारे खुप मोठी मदत मिळणार आहे. यामधे स्‍वतंत्र विहीर, पिण्‍याच्‍या पाण्‍याची टाकी, तलावरून पाणी पुरवठा जलवाहीनी खोदकाम करून टाकण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर नागरीकांना घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात येणार आहे. 


संपुर्ण भारतभर या योजनेचे मोदी सरकारने जाळे निर्माण करून ६ करोड पेक्षा जास्‍त घरापर्यंत ही योजना पोहचविली आहे.  गावक-यांना पिण्याच्या पाण्याचा भेडसावणारा प्रश्न या योजनेमळे निकाली निघणार आहे. या योजनेमध्ये ५० टक्के केंद्र सरकार व ५० टक्के राज्य सरकार खर्च करणार असून ही योजना चांगल्या प्रकारे राबविण्याकरीता सक्षम टीम उभी केली आहे. . नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून या योजनेची दोन वर्षापुर्वी निमिर्ती केली आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पिण्याकरीता पुरविणे हे त्यांचे स्वप्न असून ते २०२४ पर्यंत साकार होणार आहे. ही योजना अत्यंत चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी स्थानिक नागरीकांनी लक्ष देवून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे खा. धोत्रे यांनी म्हटले. या योजनेची कार्यान्वीत यंत्रणा जिल्हा परिषद व मजिप्रा ही आहे. 

अकोला जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश-
अकोला जिल्‍ह्यातील मुर्तिजापूर, बार्शिटाकळी, अकोला, बाळापूर, पातुर, ते्ल्‍हारा, अकोट या तालुका अंतर्गत तब्बल ७८९ गावांत जलजिवन मिशन योजने अंतर्गत कामे मंजूर झाले असल्याने या कामामुळे आता गावांतील पाणी टंचाईचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याने या कामामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. यामध्‍ये बिरसिंगपुर, सिसा, बोरगांव खुर्द, यावलखेड, चांगेफळ, बोरगांव, चिखलगांव, कोळंबी, देवळी, कोठारी, दुधलम, दोडकी, डोंगरगांव, दोनवाडा, येवता, हिंगणा कुंभारी, कळंबेश्‍वर, कापशी रोड, कट्यार, खडका, खरप खुर्द, मिर्झापुर, पैलपाडा, पळसो बु., पातुर नंदापुर, सिसा उदेगांव, सोनाळा, सोनखास, टाकळी पोटे, तामशी, वाशिंबा, वाळकी, वणी, येळवण, येवता, गाझीपुर, चिंचोली गणु, बारलिंगा, बटवाडी बु., बटवाडी खुर्द, दधम, धनेगांव, धानोरा,  हिंगणा शेळद,  खामखेड,  कुपटा, मांडवा बु., माणकी, पिंपळगांव, सांगवी जोमदेव, सातरगांव, तांदळी, तुलंगा,अजनी बु., बहिरखेड, भेंडगांव, भेंडी काजी, भेंडीमहाल, भेंडी सुत्रक, बोरमळी, चेलका, चिचखेड बु., देवदरी, धाकली, धामणदरी, धानोरा,  धोतरखेड, दोनद बु., दोनद खुर्द, फेट्रा, घोटा, हातोला, जांभरूण, जमकेश्‍वर, जांब वसु, कसारखेड, चिचखेड, कासमार, खडकी, खांबोरा, खेर्डा बु., खेर्डा खुर्द, खोपडी, कोथडी बु., कोथडी खुर्द, लोहगड व तांडा, मांगुळ, मिर्झापुर, महागांव, महान, मांडोली, मोरगांव काकड, मोरळ, मोझरी खुर्द, निंभारा, निहीदा, निंबी चेलका, निंबी बु., निंबी खुर्द, पारवा भवानी, पार्डी, पिंपळगांव चांभारे, पिंपळगांव हांडे, पुनोती खुर्द, राहीत, रेडवा, साहीत, सकनी, साल्‍पी, वाल्‍पी, सावरखेड, सायखेड, सेवानगर, सोनगीरी, शहापुर, बोरमळी, शिंदखेड, टाकळी छबीले, अनभोरा, तामसी, टेंभी, टिटवा, टिटवन, तिवसा खुर्द, उजळेश्‍वर, उमरदरी, वडगांव, वस्‍तापुर, वाघा खुर्द, झोडगा, अकोली जहॉ., अलादतपुर, सालतवाड, आरखेड, जांभा खुर्द, मोहखेड, बाळापूर, हिवरा कोरडे, बपोरी, भगोरा, बोरगांव, रामटेक, दापुरा, धामोरी बु., खुर्द, मुरंबा, धानोरा वैद्य, फनी, गोरेगांव, घुंगशी, हसनपुर, माटोडा, जामठी खुर्द, जितापुर खेडकर, समशेरपुर, कमळखेड, कानडी, कार्ली, वाई माना, कवठा सोपीनाथ, कवळा, खरप ढोरे, खरप नवले, खोडद, धानोरा वैद्य, कोळसरा, मधापुरी, नागोरी, मंदुरा, सांजापुर, रंभापुर, नागठाणा, नवसाळ, कोता, राजनापुर खिनखिनी, राजुरा सरोदे, हिरपुर, साखरी, शेलु वेताळ, शेरवाडी, सोनोरी, बपोरी, वडगांव कुरूम, दताळा, वाई माना, अंधार सावंगी, आगीखेड, आलेगांव, अंबाशी, आसोला, आस्‍टुल, बाभुळगांव, मलकापुर, भानोस, शिर्ला,बेलतळा, बेलुरा बु. खुर्द, भंडारज बु. खुर्द, बोडखा, चरणगांव, चोंडी, चिचखेड पातुर, देऊळगांव, दिग्रस बु.खुर्द, गावंडगांव, आलेगांव, गोंधळवाडी, जांब, हिंगणा, कार्ला, खामखेड, खानापुर, शेकापुर, कोसगांव, खापरखेडा, कोठारी बु.खुर्द, लऊळखेड, मलकापुर, माळराजुरा, माळसुर, नांदखेड, नवेगांव, निमखेड, पाचरण, पाळशिंगी, उमरा पांगरा, पिंपळडोली, सांगोळा, सायवणी, शिर्ला, सावरगांव, सोनुना, पांढुर्णा, उमरा पांगरा, वसाली, वहाळा बु., विवरा, झरंडी, चित्‍तलवाडी, अकोली रूपराव, झरी बाजार, पारस, धोधानी ही कामे ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जिल्‍हा परिषद, अकोला अंतर्गत करण्‍यात येत असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,अकोला अंतर्गत  वारी भैरवगड, नागरतास , बारुखेड, कारला बु, बडखेड, सौंदळा , वारखेड, दानापूर , सोनवाडी, हिंगणी खु. हयातपुर , रायखेड,. चांगलवाडी, कोठा, मालठाणा खु, मालठाणा बु. अकोली रुपराव, मालपुरा ,काळेगाव, शिरसोली , गोर्धा, बेलखेड, शेरी बु. शेरी तेल्हारा, जि. अकोला वडणेर, शेरी खु. मालेगाव बाजार, वाकोडी, जाफरापुर, वाडी आदमपुर, इसापुर, घोडेगाव, गाडेगाव , थार , तुडगाव ,खापरखेड, भांबेरी, जस्तगाव, राणेगाव,बरुड बु. भोकर पाथर्डी, टाकळी, अटाळी, मानबदा , निबोली , दापूरा , दहीगांव, वडगावरोठे, निबोरा खु,., निंबोरा बु. , वरुड वडनेर , उकळी बाजार, पिंपडल बु. , वागरगाव , बाबुळगांव , तळेगाव प्र. वडनेर, तळेगांव प्र., पातुर्डी, दौला (तळेगांव) खेल देशपांडे , उबरखेल ,खेल मुकारदम, हेल कुष्णाजी, खेल सतत्वाजी, नर्सीपूर ,खाकटा, मनांत्री बु.मनात्री खु, अडसूल , उमरी अमानतपुर, ताकोडा, अंदुरा, अंत्री मलकापुर , बाहादुरा, भोड, बोरगाव वैराळे, डोंगरगांव , दुधाळा, मंडळा , गांयगाव , हसनापूर,कडोशी, हाता, हातरुण, हिंगणा निंबा , अडोशी , जोगलखेड, सोनगिरी, काजीखेड, स्वरुपखेड, खंडाळा , कळंबा बु., कळंबा जि. अकोला खु, कळंबी महागांव , कांडली. कारंजा रमजानपुर, कसुरा , कवठा, खंडकी टाकळी , खांबोरा , कोळासा, लोहारा, हातला, लोनाग्रा, मालवाडा, मनारखेडी, मानडोली, मां जरी, जानोरी माली, मोखा , भाकराबाद, मोरगाव भाकरे, मोरगाव सादीकजन, मोरझाडी, दगडखेड, नगड, नया अंदुरा , निंबा, निंबी, निमकर्दा , सागंद, संगवी , मोहाडी, सिंगोली, सोनांला, सुकोडा, टाकली, जलंब, सावरपत्ती, टाकली खोजाबाद, बोराळा, बोराखडी, मनाली, टाकली निमकर्दा , उगवा , उरळ बु., उरळ खु, , झुरळ बु., वझेगाव,पोपटखेड जितापुर प्र. रुपराव , शहापुर रुपखेड, खैरखेड , मारी, चोरवाडी बु., पोपटखेड, मलकापुर गोंड, रेहनापूर, रुधाडी, जनुना बु,, कुंड, कोहा , बोरी, मानकरी , चिंचपाणी , डांगरखेड, खिरकुंड खु. , खिरकुंड बु. अंबाडी, राजुरा, महागाव , रुईखेड, बोचरा, अकोल खेड, अंबोला मोहाळा , सुकळी, अकोली, जाहांगीर , दिवठाणा, पणज, वाई, चंडीकापूर, वाडली देशमुख , वडगाव मेंढे, ताजणापुर , देऊळगांव रंभापूर, मंचनपुर, सावरा, मिरझापूर, आसेगाव बाझार, रामपूर धारुळ, कासोद शिवपूर, मक्रापुर, बोर्डी , वासोली नागपुर, खोलविहीर, उमरा, बेलुरा , पिंप्री जैनपूर, दैतपुर, कातखेड, गौजुदिन नगर , मलकापुर, नेहोरी खु, , नेहोरी बु. वाडली सातवाई, जळगांव नाहाते, गल्हरघाट , धारगड, केलपाणी बु. केलपाणी खु, अमोना , सोमठाणा ,शहानुर , जितापूर प्र., अडगाव , घोडा आखर , इडलापूर, वस्तापूर, प्रिप्री खु.धनकवडी, धागा, करतवाडी, कवठा खु., कवठा बु., सावरगाव , विटाळी, पुंडा, बांमर्डा, रोहणखेड, पिंप्रीखेड, उमरशेवडी, झरी बाझार, दिवणझरी, चंदनपूर, चिंचारी, बोन्हा, भिली, चिपी, काही प्र., गड चित्तलवाडी सदारपूर, नविन तलाई, तलाई आमखेड, अंबा बरवा - 1, नागरतास, बारुखेडा, लाखपुरी भटोरी ,पारद, घूगंशी , मुंगशी , विरवाडा, दताळा , सांगवामेळ , रेपाट खेड, शेलु नजिक , मंगरु कांबे, जांभा खुर्द, दुर्गवाडा , रसुलपुर , लाईत , दातवी, सांगवी, जांबा बु.आखतवाडा, आलियाबाद, अंबिकापुर , अनकवाडी, आपातापा, आपोती बु., आपोती खुर्द, बदलापुर, बहादरपुर , बहिरखेड , दहिगांव , दापुरा , धामना, धोतर्डी ,एकलारा , फरमदाबाद , गांधीग्राम , धुसर , धुसरवाडी, गोनापुर , गोंदापुर , गोपालखेड, गोत्रा हिंगना तामसवाडी, जलालबाद , कंचनपुर , कपिलेश्वर , कसाली बु., कसाली खुर्द , कौलखेड जहां, कौलखेड गोमासे, खेकडी, खोबरखेड, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द , मजलापुर , मारोडी, म्हेसांग , म्हातोडी , नवथाळ, नावखेडा , निंभोरा, नैराट , पळसो खुर्द , पाळोदी , परितवाडा , राजापुर , रामगांव , सांगवी बु,. सांगवी खुर्द , सांगळुद बु. , सांगळुद खुर्द , शामबाद सुलतान अजामपुर, वादड बु., वैराट राजापुर , वाकी , वल्लभनगर , वरुडी, अडगावं बु, अडगांव खु, अगासखेड, आलेगाव, आलेवाडी, अमिनापूर, बालेगाव, ब्राम्हणपुरी, चिंचखेड खु, , चोहट्टा, दहीहांडा,, दिनोरी , देवरी, देऊळगाव खु, , देवर्डा , धामना बु., धनगर वाडी, धारेल, दिनोडा, फत्तेपुर, गनोरी, गरसोली , गिरझापूर, हनवंत वाडी, हिलालाबाद , हिंगणी बु. (दहिहांडा), हिवरखेड, जऊळका, जोगलखेड बु. , जोगलखेड खु, खलवाडी, करतवाडी रेल्वे. करोडी, काटी, कवसा बु, कवसा खु, केळी वेळी, खानापूर, खापरवाडी बु.,खापरवाडी खु, ,खेर्डा , किनखेड, कुटासा , लामकणी, लोहारी बु. लोहारी खु, , लोतखेड, मरोडा , मुंडगाव , नाखेडगाव, नांनदखेड, नेर, निजामपुर, पलसोड, परळ, पाटी, पातोडा, पाटसुळ, पेनोरी, पिलकवाडी, पिंप्रीडीकर , पिंवडल खु., राजुरवाडी, रौंदळा , रेल, रोहणा , सालखेड, संगवी, शहापूर प्र., अकोट, शिवाजी नगर, सोनबर्डी, सुलतानपुर, टाकळी, टाकळी बु. , टाकळी खु., तळेगाव बु. तळेगावं खु., तांदुळवाडी, तरोडा, ठोक बर्डी|, बडद खु. वाणी, वरुळा, वारुर, लंघापूर राजुरा घाटे , निंबा, खांदला, किनखेड, लसनापूर, कामठा, कळमनी / कळमखेड, मोहखेड, कंझरा, धानोरा पाटेकर , विराहीत,लोधीपुर , धोत्रा शिंदे , उमरी अरब, मोझर , बिडगांव, शिवण, पिंपळ शेडा, मुरंबा , दहातोंडा, तुरखेड, गोलखेडी, हिरपुर, वाघजाळी , टिपटाळा , ब्रम्ही बु. , ब्रम्ही खु,, ब्रम्ही वाई, खापरवाडा, ताकवाडा, गुंजवाडा, पोही, शिरताळा , वोरटा, रोहणा, लोणसंणा, हिवराकोरडे , कवठा (शेलु), शेलुबाजार , पिंगळा , बल्लारखेड, सिरसोगाव / सिरसो वार्ड क्र. 1, अनभोरा ,सानोरी,सांझापुर, हातगावं, लंघापूर (पुर्नवसीत ), चिखली, कासली , कादवी  कुरुम  माना, जामठी बु. पिंज ,जनुना ,वडाळा कान्हेरी आळंद, गोव्हा, कान्हेरी, कातखेडा, परांडा, पिंपळखुटा, रुस्तमाबाद, सारव, सकुळी, विझोरा, येरंडा, धाबा जनुना (धाबा) धाबा, रांजनखेड, राजणखेड (तंडा) राजंदा, महागाव (बिटा), चिंचोली (रुद्रायणी) जालालाबाद , पाटखेड,वाघजळी, वारखेड, (वाघजळी), चोहगाव , किनखेड, साखरविरा, |शिरपुर चांगेफळ, शिरपुर, चतारी, खेट्री, पिंपळखुटा, अडगांव खु, राहेर, सस्ती, सुकळी, तुलंगा बु. तुलंगा खु., पांगरताती, वनदेव,वाडेगांव देगाव, कान्हेरी, पारस, खिरपुरी खु,, खिरपुरी बु, टाकळी कुरेशी ,नादखेड, व्याळा, माझोड, भरतपुर, गोरेगाव खु,, गोरेगाव बु, नकाशी , रिधोरा , लोणी, भौरद, कळंबेश्वर , कापशी तलाव, हिवरखेड (सुकळी) , लाखनवाडा, हिंगणा बारलिंगा, निंबी मालोकार ,चांदूर , म्हैसपुर आदि गावांचा समावेश आहे. खासदार संजय धोत्रे सातत्याने यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करण्यासाठी कार्यरत असून शहरी व ग्रामीण क्षेत्राचा विकास व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येकाला पोहोचावा या दृष्टीने सातत्याने भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पद्धतीने शासनात कारभारी आपला पाठपुरावा करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य समजून व विकासाचे गतीला प्राधान्य देण्याचे काम करत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या