Ticker

6/recent/ticker-posts

सेवा सप्ताहामध्ये अकोल्यात मोरणा नदीवर साफसफाई व स्वच्छता अभियान

सेवा सप्ताहामध्ये अकोल्यात मोरणा नदीवर साफसफाई व स्वच्छता अभियान



आंतरराष्ट्रीय नेते व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा समर्पण पंधरा वाडा साजरा करण्यात येत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह मध्ये विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. त्याच पर्वावर आज २३ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात स्थानिक तुळजाभवानी मंदिर मागील कमला नेहरू अनिकट परिसर येथे मोरणा नदी व परीसर मधे साफसफाई व स्वच्छता अभियान भाजपातर्फे राबविण्यात आले. 


यावेळी अकोला भाजपा अधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी प्रत्यक्ष मोरणा नदी व परिसराची साफसफाई करून अकोलेकरांना एक आदर्श उदाहरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा सप्ताहामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी असे विविध उपक्रम देश पातळीवर राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने आज अकोल्यामध्ये मोरणा नदी परिसरात स्वच्छता अभियान राबवील्या गेले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या