Ticker

6/recent/ticker-posts

दांडी मारणाऱ शिक्षकांसाठी शिंदे सरकारचा नवा फंडा

दांडी मारणाऱ शिक्षकांसाठी शिंदे सरकारचा नवा फंडा


दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी शिंदे सरकार कडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. दांडी बहाद्दर शिक्षकांची आता खैर नाही. शाळेत न जाताच सरकारचे पाच आकडी पगार घेणाऱ्या दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार आहे. यामुळे आपल्यासाठी सरकारने कोणते शिक्षक नियुक्त केलेत, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांना चाप लागणार आहे. 
  

सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम मात्र दुसऱ्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक पुढाऱ्यांच्या मागे फिरताना शाळेकडे फिरकतच नसल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारडून मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या