Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय सीनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निलिमा यादव नी मिळविले यश.

राज्यस्तरीय सीनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये निलिमा यादव नी मिळविले यश


अमरावती येथे ३ व ४ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सीनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रसाद कॉलोनी जठारपेठ येथील निलिमा किशनलाल यादव यश मिळविले आहे.


निलिमा ही अकोल्याच्या टोटल वेलनेस क्लबमध्ये प्रशिक्षक दिनेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. अमरावती येथील राज्यस्तरीय सीनिअर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ४७ किलोग्रॅम वजनगटात तीने एकूण १९० किलो वजन उचलून रौप्य पदक मिळविले आहे. या कामगिरीमुळे आगामी राष्ट्रीय स्पर्धेतील पॉवर लिफ्टिंगसाठी तिची निवड झाली आहे. तेथे ती विदर्भाचे प्रतिनिधित्व करेल. या यशाचे श्रेय निलिमाने तीचे वडील किशनलाल यादव, टोटल वेलनेस क्लबमधील सर्व प्रशिक्षकांना व मित्र वर्गाला देते. निलिमाच्या या यशाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या