Ticker

6/recent/ticker-posts

गणेश व गौरी पूजनासाठी मुहूर्त

गणेश व गौरी पूजनासाठी मुहूर्त



 मुंबई: यावर्षी बुधवार, दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्री गणेश पूजनासाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी बुधवार ३१ ॲागस्ट रोजी सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५५ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. जर यावेळेस गणेशपूजन करणे शक्य झाले नाही तर संपूर्ण दिवसभर कधीही गणेश पूजन केले तरी चालेल असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ज्येष्ठा गौरी शनिवार ३ सप्टेंबर रोजी रात्री १०-५६ वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही गौरी आणण्यास हरकत नाही. रविवार ४ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. ज्येष्ठा गौरींचे विसर्जन चंद्र मूळ नक्षत्रात असल्याने सोमवार ५ सप्टेंबर रोजी रात्री ८-०५ पर्यंत करावे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्यावर्षी सन २०२३ मध्ये श्रावण अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशीरा मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार .


गणपती बसवण्यासाठी मुहूर्त ..

31 तारखेला गणपती बसवण्याचे मुहूर्त सकाळी साडेपाच वाजेपासून तर रात्री साडेआठ पर्यंत केव्हाही। करण्यास हरकत नाही घरात गर्भवती स्त्री घरात असताना गणपती विसर्जित करावे किंवा नाही याबाबत काही ठिकाणी गर्भवती स्त्री असताना गणपती मूर्ती घरातच ठेवतात हे चुकीची आहे गैरसमज आहे गणपती पार्थिव असतो तो विसर्जित करावा तो विघ्नहर्ता पण आहे आणि विघ्न आणणारा पण आहे. सदर प्रथा गैरसमजतेमुळे पडलेली आहे यामुळे गणपती विसर्जन करणे हे योग्य आहे हा पंचांगाचा सिद्धांत आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या