शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथील अमंलदार यांनी हरवलेली मुलगी तिच्या पालकांचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिली
दि. 18/08/2022 रोजी नवीन बस स्टँड चौकामध्ये कर्तव्यावर असलेले पोलिस अमलदार पोलीस शिपाई विकास कोलकार बक्कल नंबर 2189 यांना नवीन बस स्टँड परिसरात एक ६ ते ७ वर्षाची सतत रडत असलेली मुलगी दिसून आली, ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती. ट्रॅफिक हवलदार विकास गोलकार यांना संशय आल्याने त्यांनी मुली जवळ जाऊन तिच्या आजूबाजूस तिच्या पालकांचा शोध घेतला, परंतु सदर मुलीचे पालक परिसरात दिसून आले नाही. ट्राफिक अंमलदारांनी त्या मुलीस विचारपूस केली तर मुलगी फक्त तिचे नाव पिहू आहे आणि तिच्या वडिलांचे नाव गौतम आहे तेवढेच सांगत होती. मिळालेल्या अपूर्ण माहितीच्या आधारे ट्राफिक अंमलदार यांनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून मुलीच्या पालकांचा शोध लावला हरवलेली मुलगी ही करतखेड निवासी श्री गौतम खाडे यांची असल्याचे निष्पन्न झाले. ट्रॅफिक अंमलदारांनी मुलीच्या वडिलांना संपर्क करून नवीन बस स्टँड येथे तिच्या पालकांना बोलावून मुलीला सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात दिले. हरवलेली मुलगी मिळाल्याने मुलीच्या आईने आनंद अश्रुत गहिवरून जाऊन ट्रॅफिक आमदारांचे मनापासून आभार मानून अकोला पोलीस दला बद्दल कृतज्ञता व्यक्त केली
शहर व वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे हरवलेली मुलगी तिच्या पालकांच्या ताब्यात परत करून शाखेकडून उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल,श्री विलास पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला यांनी सदर अमंलदाराचे कौतुक केले व अशीच कामगीरीची अपेक्षा नेहमी सर्व अमंलदारांकडुन अपेक्षीत केली आहे.
(विलास पाटील)
पोलीस निरीक्षक,
श.वा. नि. शाखा, अकोला



0 टिप्पण्या