वाहळा बू.येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती
पातूर : पातूर तालुक्यातील वहाळा बू.येथे ग्राम पंचायत मध्ये ग्रामीण युवा संघटनेने वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त ग्रामीण युवा संघटनेने ग्राम पंचायत मध्ये अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा देण्यात आली , यावेळी प्रमुख उपस्थिती ग्राम पंचायतचे उपसरपंच शामराव मोरे, व ग्राम पंचायत कर्मचारी रामेश्वर कुटे, ग्रामीण युवा संघटनेचे पातुर तालुकाध्यक्ष गणेश खरात, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर अडकणे, अमर मोरे, शंकर खरात, महादेव इंगळे, शुभम देऊळकार, योगेश भोकरे, आकाश मोरे, महेश कुटे, कुमार मोरे,मंगेश इंगळे,कार्तिक खरात, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या