Ticker

6/recent/ticker-posts

भगवान महावीर शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी

भगवान महावीर शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी


अकोला धर्म रक्षा तसेच मानवता धर्माचा पालन करून निरोगी जीवन सोबत गौरक्षा, संस्कृती परंपरा सोबत त्याग तपस्या तसेच साधनाचा अंगीकार करून मनुष्य जीवन सार्थ करण्यासाठी परिवार राष्ट्र समाज परिसर विकासासाठी प्रत्येकाने कार्य करावे भगवान महावीर शिकवण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून साधुसंतांचा आदर जीव मात्रावर दया करून त्यांच्या हक्काची रक्कम खर्च करावी आपल्या कमाईतून खर्च करा असा उपदेश आचार्य भगवंत 108 श्री विद्यासागरजी महाराज यांनी दिला.  


अकोल्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी गौरक्षण उभारणीचा संकल्प केला असून यानिमित्ताने आचार्य भगवंत विद्यासागर जी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिरपूर जैन येथे गेले असता त्यांनी आशीर्वाद वचन देऊन गौरक्षणासाठी त्यांनी आशीर्वाद घेऊन गोरक्षण गौरक्षा ‌ यशस्वी ठरेल असा आशीर्वाद त्यांनी प्रदान केला. यावेळी एलक श्री 105 सिद्धांतसागरजी महाराज यांनी महाराज श्री यांच्या वतीने अशा राष्ट्रधर्म धर्म रक्षा संस्कृती रक्षक करण्यात आशीर्वाद संदेश त्यांनी प्रदान केला मुनिश्री 108 प्रसादसागर जी मुनीश्री 108 चंद्रप्रभासागरजी महाराज मुनिश्री 108 निरामयज सागरजी महाराज यांनी सुद्धा आशीर्वाद दिले  यावेळी अनिल मानधने, अपेक्षा मानधने, कविता मानधने, हिम्मत चौधरी निरंजन भाला, हरीश चौधरी, प्रशांत लोहिया, गिरीराज तिवारी, गणपत चौधरी, कैलास लतुरिया, सुभाष लटुरीया, गिरीश जोशी, यांच्यासोबत शिरपूर येथील चातुर्मास समितीचे अध्यक्ष मुकुंदजी वालचाले, कार्याध्यक्ष जितेंद्र छाबडा ,प्रसिद्धी  सचिव प्राचार्य प्रशांत गडेकर, हितेश चौधरी, पवनबाहेती आधी उपस्थित होते. अकोल्यातून होणाऱ्या गौरक्षणाच्या उपक्रमाचा संपूर्ण भारतभर कौतुक होत आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या