Ticker

6/recent/ticker-posts

आयुष्याला आकार देणाऱ्या आईचे निधन वेदनादायी: आ.सुधीर मुनगंटीवार

आयुष्याला आकार देणाऱ्या आईचे निधन वेदनादायी: आ.सुधीर मुनगंटीवार 

स्व. श्रीमती सरस्वती पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वतीताई पाटील
यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी व्यक्त केली.
*आई, तूच माझ्या आयुष्याची बदललीस ग काया,*
*साष्टांग नमन करुनी पडतो आई मी तुझ्या पाया*
*प्रेम तुझे आहे आई, जगात सर्वांहुन भारी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !*


, आयुष्यातील सत्यता आहे. तुम्हाला आम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यासाठी जिवाचं रान करणारी, प्रसंगी चुका पदरात घालणारी, सुख दुःख जिच्याकडे अत्यंत मोकळेपणानं मांडू शकतो असं हक्काचं व्यासपीठ जेव्हा आयुष्यातून निघून जातं ती वेदना किती असह्य असेल हे आम्ही समजू शकतो.
करवीनिवासिनी माता महालक्ष्मी या दुःखातून सावरण्याची शक्ती आदरणीय चंद्रकांतदादा यांना प्रदान करो हिच प्रार्थना. अकोला भाजपा परिवाराकडून आदरणीय आईना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या