राणी सती दादी यांचा प्रतिमा विशेष पूजा अर्चना
अकोला भक्तांची इच्छापूर्ती करणारी श्री राणी सती दादी मंगल पाठ विदर्भात विदर्भ आंध्र प्रदेश मध्ये तेरा दिवशी कार्यक्रम वर राणी सती दादी यांचा प्रतिमा विशेष पूजा अर्चना करून श्री शेत्र कोणीण्यपूर येथे मा दुर्गा व रुक्मिणीचा आशीर्वाद घेऊन राज राजेश्वर नगरीमध्ये 28 जुलाई गुरुवार रोजी येत असून स्थानिक शक्तीपीठ राणी सती धाम जिल्हा परिषद रोड येथे कार्यक्रमांमध्ये 5000 पेक्षा जास्त मातृ शक्ती सहभागी होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्री क्षेत्र कोणण्यपूर येथून 17 जुलै पासून रथयात्रा व मंगल पाठ श्री नारायणी नमो नमो विदर्भ तर्फे आरंभ करण्यात आला. नागपूर, चंद्रपूर ,वणी, आदिलाबाद, चंद्रपूर नांदेड, हिंगोली, अकोट अमरावती , खामगाव श्री राणी सती दादी यांचा रथ राज राजेश्वर नगरीमध्ये 28 जुलै गुरुवार रोजी येत असून स्थानिक रामदेव बाबा श्याम बाबा मंदिरापासून मोटरसायकल रॅलीने रथ येऊन हजारो भक्तांच्या साक्षीने श्री राणी सती दादी व शिव अर्चना पूजा अर्चना सहस्त्र धारा महाभिषेक सर्वांच्या मनोकामनापूर्तीसाठी होणार आहे.
28 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पासून वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने असून दुपारी दोन वाजता श्री राणी सती दादी यांचे परमभक्त कवर राणा वंशज तेजस राणा राजस्थान अजमेर इथून मंगल पाठ व भजन संध्या साठी राज राजेश्वर नगरीमध्ये येत असून बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पावसाळा लक्षात घेता मंडप तसे आकर्षक रोषणाई सजावट तसेच फुलांची सजावट हैदराबाद कलकत्ता, जयपुर येत असून श्री राणी सती धाम परिसर यासाठी गेल्या आठ दिवसापासून श्री नारायणी नमो नमो संस्थेचे पदाधिकारी विविध समाजातील कार्यकर्ते मातृ शक्ती श्री राणी सती धाम ट्रस्ट तसेच या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगाना, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ येथून मोठ्या प्रमाणात श्री राणी सती भक्त येणार आहे तसेच राज राजेश्वर नगरी आणि पंचकोशीतील मातृ शक्ती यामध्ये सहभागी होणार आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या