Ticker

6/recent/ticker-posts

आसरा माता कॉलनी डाबकी मधील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी

आसरा माता कॉलनी डाबकी मधील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी


 शेत स. नं. ९५/१, ९५/२, ९५/३, ९५/४ व आसरा माता कॉलनीमध्ये डाबकी रोड उडाण पुलाच्या पुर्वेकडील भागात रेल्वे लाईनच्या बाजू पक्के घरे बांधून बऱ्याच वर्षापासून रहिवाशी असून आमच्या राहण्याच्या वस्तीमध्ये व घराकडे जाण्या येण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नसुन पावसाळयामध्ये प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामूळे त्रास सहन करावा लागत असून ठिक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे आमच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच शेत स.नं. ९५/१,९५/२,९५/३,९५/४ हा भाग अकोला महानगर पालिका हद्दीत समाविष्ट झाला असून येथे कोणत्याही प्रकारची मुलभुत सुविधा अकोला महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तसेच सदर ठिकाणी नळ, नाल्या, रस्ते, विद्युत पुरवठा, पाण्याचा निचरा अशी कोणतीही मुलभुत सुविधा महानगर पालिकेने आजपर्यत आम्हाला उपलब्ध करून दिली नाही.


आम्ही याअगोदर रस्ता डांबरीकरणासाठी व वरील सोयी सुविधा मिळण्यासाठी मा. जिल्हाधिकारी अकोला, मा. आयुक्त अकोला महानगर पालिका अकोला, मा. महसुल मंत्री महा.राज्य. मुंबई तसेच मा. मुख्यमंत्री महा. राज्य.मुंबई यांना तसेच या परिसराचे विद्यमान आमदार यांना सुध्दा सामुहिक सहयांचे निवेदन दिले आहे. तरी अजुनपर्यंत कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. तसेच आम्ही रहिवाशी अकोला महानगरपालिकेचे नियमित करदाते असून कर सुध्दा नियमीत स्वरूपात भरणा करीत आहो..

तरी सदरचे निवेदन दिल्या पासुन आठ दिवसाचे आत रस्त्याचे डांबरीकरण व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. अन्यथा आम्ही रहिवाशी आमच्या मुलभुल हक्कासाठी आमरण उपोषणास बसण्याचा पक्का निर्धार केला आहे. या बाबतची सुचना आम्ही आपणांस या लेखी निवेदनाद्वारे आपणांस देत आहो.

तरी आपण आमच्या निवेदनाचा सहानुभुतीपूर्वक विचार करून आम्ही नमुद केलेल्या सोयीसुविधा आम्हाला उपलब्ध करून देण्याची कृपा करावी ही विनंती. करीता आपल्या सेवेशी नम्र निवेदन सादर करीत आहो. आसरा माता कॉलनी डाबकी येथील रहिवासी ओमकार वाडेकर, अमल अग्रवाल व रहीवासी अंतस्थ होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या