Ticker

6/recent/ticker-posts

एकाच पदावर एकाच ठिकाणी 10 वर्ष पेक्षा जास्त ठाण मांडून

 एकाच पदावर एकाच ठिकाणी 10 वर्ष पेक्षा जास्त ठाण मांडून 



अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला यांनी शासनाचे नियम पायदळी तुडवून एकाच पदावर एकाच ठिकाणी 10 वर्ष पेक्षा जास्त ठाण मांडून बसलेल्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्याक प्राध्यापक, फिजिशियन/डॉक्टर यांची तात्काळ बदली करणसाठी दिले निवेदन.


  शासनाच्या धैर्य धोरणनुसार व प्रचलित नियमानुसार वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांना 1 पदावर एकाच ठिकाणी 3 वर्षा पेक्षा जास्त काळ ठेवणे हे अयोग्य आहे किंवा ठेवता येत नाही कारण तसे केल्यास त्या ठिकाणी 3 वर्षा पेक्षा जास्त काळ राहणारा अधिकारी हा मुजोर व भ्रष्टाचारी बनतो तसेच त्याची मक्तेदारी वाढते त्यामुळे शासन स्थरावर 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांची बदली 3 वर्षात करणे आवश्यक आहे. अकोला च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय मधील डॉक्टर गेल्या कित्येक वर्षा  पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये ठाण मांडून बसले आहेत. या सगळ्या डॉक्टर चे खाजगी हॉस्पिटल/ दवाखाने/ क्लीनिक आहेत. व हे डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस ही करतात पण या कडे प्रशासनाच व सरकारच लक्ष नाही. यांच्या बदल्या कोणत्या नियमांतर्गत करता येत नाही हा एक खूप मोठा संशोधनाचा विषय आहे.  व सगळे डॉक्टर, विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक सगळ्यांचे खाजगी हॉस्पिटल अकोला शहरात जोमात सुरू आहे. त्यामुळे डॉक्टर आपला वेळ ओपीडी ला व वॉर्ड मधील रुग्नांणा वेळ देऊ शकत नाही. सगळा वेळ त्यांच्या खाजगी हॉस्पिटल ला देतात. आणि विशेष म्हणजे सर्वोपचार मधील रुग्णालयाच्या भरपूर तक्रारी असून डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे किती तरी पेशंट दगावले आहेत. व कोणते ही डॉक्टर ऍडमिट झालेल्या पेशंट किंवा नातेवाईकांन सोबत सौजन्याने वागत नसून या सगळ्या डॉक्टर वर तात्काळ बदली करण्यात यावी असे निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे अधिष्ठाता यांच्या मार्फत  वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव याना देण्यात आले.


       अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करेल याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी  विनंती जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांनी केली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या