न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये संस्थेचा वर्धापन दिन, लो.टिळक यांची जयंती उत्साहात संपन्न
अकोला एज्युकेशन सोसायटी, अकोला व न्यू इंग्लिश हायस्कूलचा 95 वा वर्धापन दिन तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 166 वी जयंती न्यू इंग्लिश हायस्कूल,अकोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब मांडवगणे यांनी भूषवले तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे जेष्ठ उपाध्यक्ष ॲड. श्री गिरीश देशपांडे ,कनिष्ठ उपाध्यक्ष श्री देव सर तसेच मानद सचिव प्रा. श्री अमरावतीकर सर यांनी भुषविले.
लो.टिळकांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात रसिका जयस्वाल मॅडम यांच्या मधूर स्वरातील शारदा स्तवनाने झाली.नंतर सौ.रसिका मोहरील मॅडम यांनी संस्थेच्या स्थापनेपासून म्हटल्या जाणाऱ्या रक्ष रक्ष ईश्वरा ह्या प्रार्थनेने वातावरणात चैतन्य निर्माण केले.
सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेच्या अहवालाचे वाचन केले. प्रा.अमरावतीकर सरांनी सर्व मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे संस्थेच्या वतीने कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.भाऊसाहेब मांडवगणे सरांनी संस्थेचा 95 वर्षांचा प्रवास व आलेल्या संकटाला संधी मानुन शतकाकडे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या आपल्या संस्थेची प्रगती विषद केली.या प्रसंगी ॲड .देशपांडे सर,मा.दिगंबर सरांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रा. रसिका पातुरकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.आरती मुळे मॅडम यांनी केले. शाळेच्या व संस्थेच्या प्रगतीसाठी व शतकपूर्ती करिता सर्व शाळा सज्ज असल्याचे संकल्प यावेळी मा.मुख्याध्यापकांनी केले.
कार्यक्रमाचा शेवट सौ.रसिका जयस्वाल यांनी सादर केलेल्या पसायदानाने करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या