Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्कान पथका व्दारे १४६ मिसींग व्यक्तीचा शोध घेण्यात आला

अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्कान पथका व्दारे १४६ मिसींग व्यक्तीचा शोध घेण्यात आला


मा. जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोला जिल्हयातुन मिसीग झालेल्या महीला व पुरूष यांचा शोध घेणे करीता तसेच अपहत मुली यांचा शोध घेणे करीता दिनांक ०१.०६.२०२२ ते ३०.०६.२०२२ पावेतो मुस्कान पथक या विशेष मोहीमचे आयोजन करून जिल्हयातील मिसींग महीला, पुरूष व अपहत मुली यांचा शोध घेणे करीता वेगवेगळे पथक तयार करून त्या पथकाव्दारे एकुण १४६ मिसींग व्यक्तींचा शोध लावला त्यापैकी ८३ महीला, ५० पुरुष व १३ अपहृत मुली यांचा शोध घेवून त्यांना त्यांचे कुटुंबाचे ताब्यात देण्यात आले.


सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधिक्षक मॅडम श्रीमती मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री संतोष महल्ले, स्थागुशा, अकोला, स्थागुशा, अकोला, म.पो. हवा. अनिता टेकाम व पोलीस स्टेशनचे महीला व पुरुष अमंलदार यांनी केली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या