Ticker

6/recent/ticker-posts

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा


माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार दंड व कलम 294 अन्वये दोन हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील अग्रसेन चौकात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी हुज्जत घातली होती. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने रामदास पेठ पोलिसांनी याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन रामदास पेठ पोलिसांनी माजी क्रिडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.


या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.डी.गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा,पाच हजार दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारी वकिल अ‍ॅड.दिपक गोटे यांनी न्यालयीन कामकाज पाहिले. त्यांना सिएमएस सेलचे राम पांडे व पोलिस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या