Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत जलालाबाद येथील भ्रस्टाचाराची सखोल चौकशी करा, असा ग्रामविकास मंत्री यांचा आदेश

ग्रामपंचायत जलालाबाद येथील भ्रस्टाचाराची सखोल चौकशी करा, असा ग्रामविकास मंत्री यांचा आदेश 


ग्रा.पं. जलालाबाद ता. बार्शीटाकळी जि. अकोला येथे गेल्या आठ वर्षा पासून आपल्या पदाचा गैरवापर करत सरपंच व सचिव यांनी शासनामार्फत येणाऱ्या सर्व योजनांमध्ये उदा. रस्ते,नाल्या, शेतरस्ते,पेव्हर्स रस्ते, व इतर बांधकामामध्ये इस्टीमेट नुसार कामे केली नसून, निःस्कृष्ठ दर्जाची कामे केली आहेत.गरजू लाभार्थी, विधवा व अपंगाना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं व काही कामे फक्त कागदोपत्री दाखवून शासकीय निधीचा गैरव्यावहार करण्यात आला आहे, असा दावा करण्यात येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,बार्शीटाकळी चे इंजि. श्री अजय रामेश्वर नावकार व ग्रामस्थ जलालाबाद यांनी केली आहे.


 दि.26/03/2020 रोजी अजय नावकार यांनी सचिव ग्रा. पं.जलालाबाद यांना पहिला माहिती अधिकार सादर केला असता त्यांनी माहिती न दिल्यामुळे मा आयुक्त साहेब अमरावती पर्यंत त्यांनी माहिती अधिकाराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावरही माहिती न मिळाल्याने अजय नावकार यांनी मा. ग.वि. अधिकारी बार्शीटाकळी ते ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी व सर्व लोकप्रतिनिधी यांना विनंती पूर्वक निवेदने सादर केलीत त्यावर दि.10/11/2021 रोजी एक तालुका स्तराची समिती गठीत करण्यात आली होती, परंतु त्या समितीने कुठल्याही प्रकारची चौकशी न केल्यामुळे परत अजय नावकार यांनी मा. मु. का. अधिकार व ग्रामविकास मंत्री साहेब यांना उच्चस्तरीय समितीची मागणी केल्यावर ग्रामविकास मंत्री व सर्व लोकप्रतिनिधी यांनी ग्रा. पं. जलालाबाद ची सखोल चौकशीचे आदेश दिल्यामुळे आता उच्चस्तरीय समिती गठीत केली असून या समितीने येणाऱ्या दि.13/06/2022 रोजी सकाळी 10 वाजता पासून चौकशी ठरविले आहे,आता तरी योग्य ती चौकशी होईल अशी आशा अजय नावकार व जलालाबाद ग्रामस्थांना लागली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या