Ticker

6/recent/ticker-posts

वाहळा बू. येथे दोन घरफोड्या : दीड लाखाचा ऐवज लंपास चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ,सोन्याचे दागिने व रोख घेऊन चोरटे पसार

वाहळा बू. येथे दोन घरफोड्या : दीड लाखाचा ऐवज लंपास
चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ,सोन्याचे दागिने व रोख घेऊन चोरटे पसार 


प्रतिनिधी नासीर शेख पातुर
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत वाहळा बू. येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्या करून एक लाख ५८ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार दि.९ जून रोजीच्या सकाळी उघडकीस आल्याने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.वाहळा बू. येथील संतोष परकाळे हे शेतात रात्री भुईमूग पिकावर राखण करण्यासाठी गेले असता, रात्री त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरासमोरील आवारात झोपले होते, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख तसेच निराधार महिलेच्या घरातील लोखंडी पेटी शेतात नेऊन त्यातील ५ हजार रोख असा एकूण एक लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. सदर घटनेची माहिती सरपंच पती परशराम भोकरे यांनी चान्नी पोलिसांना दिली,माहिती मिळताच ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश महाजन , बाळकृष्ण येवले, सुधाकर करवते, आदींनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुद्धा घटनास्थळी भेट दिली असून, चान्नी पोलिसांनी शवन व फिंगर पथकालाही पाचारण केले होते परंतु काहीच सुगावा लागला नाही, पुढील तपास ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश महाजन करीत आहे.


निराधार महिला व अल्पभूधारक शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ
अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी कष्ट करून सोन्याचे दागिने व रोख ठेवली होती, तसेच निराधार महिलेने पण मजुरी करून रोख जमा केली होती, परंतु अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून दागिने व रोख लंपास केल्याने अल्पभूधारक व निराधार महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे.


चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
नुकतेच चान्नी पोलीस स्टेशन हद्दीच्या सीमेवर तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतील शेतात एका घरात चोरट्यांनी प्रवेश करून महिला, लहान मुलगा व वृद्धांना बेदम मारहाण करून बळजबरी घरफोडी केल्याची घटना घडली होती, याचा तपास बुलढाणा पोलिस करीत आहे, त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या