Ticker

6/recent/ticker-posts

स्त्री रूग्णालय अकोला कंत्राटी पदभरती रद्द करून आर्थिक अपहार दोषींवर कारवाई करण्याची मागणी

स्त्री रूग्णालय अकोला कंत्राटी पदभरती रद्द करून आर्थिक अपहार दोषींवर कारवाई करण्याची मागणी


 उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ अकोला व वैधकिय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला यांची विभागीय चौकशी करून जिल्हा स्त्री रुग्णालया मधील कंत्राटी पदभरती रद्द करून झालेल्या आर्थिक अपहार याबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी. आरोग्य विभागाच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील पदभरती प्रक्रियेत शासन निर्णयांना डावलून तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात टाकून सेवा दिली अश्या कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित करून आरोग्य उपसंचालक व जिल्हा स्त्री रुग्णालय मधील अधिकारी/कर्मचारी च्या नातेवाईकांचा नियमबाह्य निवड करून 103 लोकांची निवड करण्यात आली. अशी गंभीर बाब आज 01 जुन 2022 उघडकीस आली. उपसंचालक डॉ चव्हाण आणि वैधकीय अधीक्षक डॉ आरती कुलवाल हे एवढे हुकूमशाही, मनमानी, भोंगळ कारभार करत असून सार्वजनिक आरोग्य विभागाचा नाव खराब करीत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सांगणंमताने ही भरती प्रकिया राबविण्यात आली अशी चर्चा सर्व दूर सुरू आहे यांच्या विषयी अनेक तक्रारी आपल्या मिळाल्या आहेत पण त्यांच्या वर आपला हात असून त्यांना आपले पाठबळ असल्यामुळे अश्या भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्यावरअजून कुठली ही कार्येवाही होत नाही.


   जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित आरोग्य सेवाकरिता उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ कार्यालय अकोला मार्फत कंत्राटी पद्धतीवर पदभर्तीची प्रक्रिया राबविण्यात आली असून, प्रक्रिया राबविण्यात असता संबंधित अधिकाऱ्यांनकडून मनमानी मर्जीतल्या उमेदवारांना नातेवाईकांना पैसे घेऊन नियुक्ती दिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 
    तसेच उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ किंवा जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी कोणती जाहितारात काढली नसून डी. एम. इंटरप्राइजेस यांनी 103 कुशल व अकुशल जागा भरल्या कशा? हा प्रश्न निर्माण होतो याचा च अर्थ की या मध्ये उपसंचालक डॉ चव्हाण व अधिक्षक डॉ कुलवाल यांच्या मार्फत घोटाळा झाल्याचा नाकारता येत नाही. अश्या प्रकारचे आर्थिक अपहार करण्याचे धाडस या अधिकाऱ्याना एकाच ठिकाणी 12 वर्षपासून कार्यरत असल्यामुळे आले आहेत त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची या जिल्ह्यातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी .


तसेच आपल्या उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ यांची विभागीय चौकशी करून जिल्हा स्त्री रुग्णालय मधी कंत्राटी पदभरती रद्द करण्यात यावी. व सगळे उमेदवार यांची कागदपत्रे तपासणी करावी. व झालेली कार्येवाही कळविण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन, उपोषण, करण्यात येईल याची कृपया गंभीर नोंद घेण्यात यावी, असे स्वरूपाचे निवेदन मा. जिल्हा शल्य चिकित्सक मार्फत मा. राधास्वामी एन आयुक्त, आरोग्य सेवा, आरोग्य अभियान याना रुग्णसेवक संघायनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सावळे यांनी दिले सोबत उमेश इंगके, रत्नदीप खरात, समीर खान नितीन सपकाळ, शेरू मिश्रा उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या