लोकनेते गोपीनाथ जी मुंडे यांच्या 8 व्या पुण्यतिथीनिमित्त यांना अभिवादन
अकोला संघर्ष व संकटातून मात करत भारतीय जनता पक्षाचा विस्तार महाराष्ट्र व देशभरात करणारे लोक नेते भाजपाचे ओबीसीचे चेहरा तसेच स्वर्गीय वसंतराव भागवत यांचा स्वतः साकार करणारे गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीमध्ये पक्षाचा विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने कार्यरत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले. भाजपा कार्यालयात लोकनेते माजी केंद्रीय मंत्री माजी उपमुख्यमंत्री उत्कृष्ट वक्ते लोकनेते गोपीनाथ जी मुंडे यांच्या 8 व्या पुण्यतिथीनिमित्त यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर माधव मानकर, संजय गोटेफोडे, संजय जिरापुरे संजय गोडा अक्षय गंगाखेडकर, अमोल गोगे निलेशनीनोरे चंदा शर्मा, देवाशिष काकड संतोष पांडे राजेंद्र गिरी गणेश अंधारे, नितीन राऊत मनोज साहू रमेश करीहार, बन्सी चव्हाण संतोष अग्रवाल भूषण इदोरी या,दिलीप मिश्रा , रणजीत खेडकर विकी ठाकूर,पवन महल्ले,नितीन महाले अमोल मोहोकार, विजय चौधरी विजय ठाकूर, अभिजीत बांगर अमोल गीते उमेश गुजर, अभिजीत कडू धनंजय धबाले मनीराम टाले रामदास सरोदे राजू थोरवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातील अनेक बाबी सांगून यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला . व्यक्तिमत्त्वाचे धनी कार्यकर्त्यावर प्रेम करणारे पक्ष विस्तारासाठी सदैव तत्पर राहणारे सर्वसामान्यांना आधार देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमासंदर्भात आमदार सावरकर यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची उपस्थिती व लाखो लोक यांची उपस्थिती ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे संचालन संजय गोडफोडे प्रास्ताविक माधव मानकर आभार प्रदर्शन एडवोकेट देवाशीष काकड यांनी केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या