Ticker

6/recent/ticker-posts

दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन 4 गंभीररीत्या जखमी

दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन 4 गंभीररीत्या जखमी


स्थानिय मुर्तीजापुर ते दर्यापूर रोडवर सिरसो प्लॉट जवळ आज दिनांक 26 जुन 2022 रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान दोन मोटर सायकलची समोरासमोर जबरदस्त धडक होऊन तीन व्यक्ती एक महिला जखमी झाल्याची घटना घडली.


            सदर अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार एका मोटरसायकलचा टायर फुटल्याने एवढा गंभीर स्वरूपाचा अपघात घडल्याची घटना झाली. दोन्ही मोटारसायकलींचा अक्षरशा चुराडा झाला.या अपघातामधील मोटरसायकल स्वारांची नावे कृष्णा श्रीराम मोहरील वय 25, गणेश पुंड वय 32 राहणार उंबर्डाबाजार तसेच सुवर्णा श्रीकृष्ण जामनिक वय 45 ,सागर श्रीकृष्ण जामनिक वय 28 राहणार लाखपुरी टाकळी येतील असल्याचे समजले.या घटनेची माहिती गंपू शर्मा संचालित वंदे मातरम आपात्कालीन पथकास भ्रमणध्वनी वरूण प्राप्त होताचं सदैव तत्पर तयार असणाऱ्या वंदे मातरम आपात्कालीन पथकातील मोहम्मद इमरान, विकी गावंडे,रितेश चींनाप्पा या टीमने गंभीररित्या जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.परंतु चौघांची प्रकृती फारच गंभीर स्वरूपाचीअसल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अकोला रेफर करण्यात आले यामध्ये उंबर्डाबाजार येथील एक व्यक्ती रस्त्याने जाताना मयत झाल्याचे समजले.


         सदर घटनाक्रम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने घटनेबाबत तपासकार्य करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.


संतोष माने अकोला प्रतिनिधी:-


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या