Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास आजन्म कारावास 


4 लाख दहा हजाराचा दंडही ठोठावला


अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीला गुजरात इथून नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध स्थापन करणाऱ्या आरोपीविरोधात विशेष न्यायालय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि.डि. पिंपळकर यांच्या न्यायालयाने विविध कलमांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच चार लाख दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सागर रमेश शंभरकर असे आरोपीचे नाव आहे.अकोट फाइल पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये राहणारे एक अल्पवयीन मुलगी 4 ऑक्टोंबर 2016 रोजी शाळेत गेली होती परंतु ती शाळा सुटल्यानंतरही घरी परत आली नाही त्यामुळे तिचा शोध सुरू असताना तिनं मिळून आल्याने यासंदर्भात अकोट फाइल पोलीस स्टेशन येथे तिच्या आजीने तक्रार दाखल केली होती.


पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्यानुसार अल्पवयीन मुलगी व आरोपी सागर रमेश शंभरकर सहा महिन्यांनी घरी परत आला ते दोघे गुजरात ते गेले होते त्या ठिकाणी ते पती-पत्नी सारखे राहत होते अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली पोलिसांनी या प्रकरणी भादवि कलम 363, 376, (2) (एन), पास्को कायदा कलम 3, 4,5, नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर शंभरकर अटकही केली त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करीत न्यायप्रविष्ट केले न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने भा.द.वि. कलम 363 मध्ये 7 वर्ष कारावास दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा, 376,376(2)(एन) व पास्को कायदा कलम 3,4,5 मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली सरकारतर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. पी.एस.आय. छाया वाघ यांनी या प्रकरणाचा तपास केला होता सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोग्यता श्रीमती मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली होती.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या