समाजातील विखार संपविण्यासाठी संतांचे विचार जनमानसात रुजविणे गरजेचे — ह.भ प.शामसुंदर सोन्नर महाराज
महाराष्ट्र अंनिस च्या जनप्रबोधन यात्रेची सुरुवात
अकोला दि. १४ मे, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धांची घाण स्वच्छ करण्याचे व विवेकी विचार देण्याचे कार्य संतांनी केले असून समाजातील वाढता विखार कमी करण्यासाठी संताचे हे विचार व कार्याचा जनप्रबोधन वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवत असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर मुंबई यांनी गाडगे बाबा जन्मभूमी शेडगाव येथे केले.
महाराष्ट्र अंनिसच्या वतीने 14 ते 23 मे या कालावधीत आयोजित शेंडगाव ते पंढरपूर या वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा जनप्रबोधन यात्रेच्या शुभारंभप्रसंगी श्री शामसुंदर महाराज बोलत होते संत गाडगे बाबा यांचे जन्मस्थान शेंडगाव येथे आयोजित शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस माधव वावगे, राज्य ऊपाध्यक्ष महादेवराव भुईभार, शेंडगाव चे सरपंच गजानन सोळंके, उपसरपंच स्वप्निल साबळे, राज्य सरचिटणीस सरचिटणीस प्रा.बबनराव कानकिरड, जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ.संजय तिडके, अभियान प्रमुख मनोहर जायभाये,हनुमंत मुंडे, विनोद चोंडके, सुभाष वडुरकर गाडगे बाबाचे पणतु नितीन जानोरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गाडगे बाबाचे जन्मस्थानी मान्यवरांचे हस्ते वृक्ष रोपट्यास पाणी घालून या जनप्रबोधन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला
राज्य सरचिटणीस माधव वावगे यांनी प्रास्ताविकात शेंडगाव ते पंढरपूर जनप्रबोधन यात्रेच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली तर महादेवराव भुईभार यांनी संत गाडगे बाबाचे वेशभुषेत कीर्तन सादर केले. सरपंच गजानन सोळंके यांनी महा अंनिस च्या या ऊपक्रमास शुभेच्छा देऊन गाडगे बाबा जन्मभुमी विकासास सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ.संजय तिडके यांनी सूत्रसंचालन तर विनोद चोंडके यांनी आभार मानले. ही जनप्रबोधन यात्रा पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चे मोझरी येथे जाणार असुन पुढे मुक्ताईनगर मार्गाने पंढरपूर पोहचणार आहे.
या कार्यक्रमास गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोलाचे अध्यक्ष रोहन बुंदेले, वैष्णवी आसेकर, राजश्री ईंगळे, प्रा प्रविण काळे, प्रदीप पाटील साबळे यांचेसह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 टिप्पण्या