Ticker

6/recent/ticker-posts

ॲड्. अनंत खेळकरांच्या लघुकथासंग्रहाचे ना. नितीन गडकरी ह्यांचे हस्ते प्रकाशन संपन्न

ॲड्. अनंत खेळकरांच्या लघुकथासंग्रहाचे ना. नितीन गडकरी ह्यांचे हस्ते प्रकाशन संपन्न


सुप्रसिध्द साहित्तीक , स्तंभ लेखक मायबोली साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड्. अनंत खेळकर ह्यांच्या ‘असते असेच अंतरी ‘ ह्या लघुकथा अन् कविता संग्रहाचे प्रकाशन डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॅा. के आर ठाकरे सभागृहात  केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी ह्यांचे हस्ते प्रकाशीत झाले .ह्या वेळी व्यापिठावर कृषी मंत्री ना दादा भुसे, तसेच सर्व पक्षीय आमदार आणि विवीध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार रणधिर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा ,आ.अमोल मिटकरी, माजी मंत्री डॅा. रणजीत पाटील, आमदार वसंत खंडेलवाल ,आ.प्रकाश भारसाकळे,आ.हरीश पिंपळे, माजी आमदार चैनसुख संचेती,विजयराज शिंदे, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. विलास भाले ,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ , नागपूरचे कुलगुरू डॅा. आशिष पातुरकर तसेच 


अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा , अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त व्यासपीठावर विराजमान होते. कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, प्रतिथयश ऊद्योजक, विचारवंत, लेखक, साहित्तीक, शास्त्रज्ञ ,कलावंता सोबतच सर्व पत्रकार बांधव आणि विद्यार्थ्यांची ऊपस्थीत लाभली होती लघुकथासंग्राचे सुरेख रेखाटन राजेश बारड ह्यांनी केले असुन ख्यातनाम ऊद्योगपती विनोदभैय्या पाटील ह्यांनी प्रायोजीत केले आहे .पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही सामाजीक कार्यासाठी दान करण्यात येणार आहे. 
प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचलन डॅा किशोर बिडवे यांनी तर आभारप्रदर्शन कुलगुरू डॅा. विलास भाले ह्यांनी केले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या