उद्धव ठाकरेंच्या आदेश अकोला शिवसेना जिल्हा प्रमुखपदी गोपाल दातकर
अकोला : मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये गोपाल दातकर यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खळबळजनक म्हणजे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सेवकराम ताथोड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पिंजरकर यांनी एका 'लेटर बॉम्ब'नं आरोप-प्रत्यारोपांच्या दुसऱ्या पर्वाला सुरवात केली होती. त्यांनी पक्षाचे आमदार माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र लिहीले होते. पत्रात थेट पक्षाचे अकोल्यातील बाळापूरचे आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. पिंजरकर यांनी आमदार देशमुख यांयांच्यावरी खंडणीखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. परंतु आमदार नितीन देशमुखांनी सहसंपर्कप्रमुखांचे आरोप फेटाळलून लावले होते. असे अकोला शिवसेना पक्षातील हे आरोप-प्रत्यारोप फार गंभीर होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. ज्यामध्ये गोपाल दातकर यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्याकडे अकोला पूर्व, अकोट मतदार संघ आणि मूर्तीजापूर मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. तर शिवसेना आमदार तथा माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर बाळापुर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे थेट शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करणारे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी सेवकराम ताथोड यांची नियुक्ती करण्यात आली. या फेरबदलाने अकोला जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या