प्रवीण चोपडेंच्या कल्याणी ने केली परिवाराची स्वप्नपूर्ती
कल्याणी झाली एम बी बी एस डॉकटर
अकोला ---एक जमाना होता की, मागासवर्गीय समाजाला शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्यातच मुलीला तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने आणि कष्टाने शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला मात्र मनुवादी विचारसरणी च्या लोकांनी शिक्षण क्षेत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न कित्येक दशकांपासून सुरू आहेत मात्र विद्वाता असली की यशोशिखरावर पोहचता येते हे प्रवीण चोपडेंच्या कल्याणी या मुलीने दाखवून दिले आहे
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांची मुलगी कल्याणी हिने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधून वैद्यकीय
शिक्षण पूर्ण केले . तिच्यात मोठ्या प्रमाणावर विद्वाता होती त्याच जोरावर महाग आणि कठीण असलेल्या एम बी बी एस सारख्या शिक्षणसाठी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील असूनही यशस्वीपणे पूर्ण केले आहे कालच संपन्न झालेल्या पदवीदान समारंभात कल्याणीने एम बी बी एस ची पदवी घेतली आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया येथील जिल्हाधिकारी नयना गुंडे, डीन कुसुमाकर घोरपडे, प्रविण जाधव , तिवारी , पाटील मॅडम याच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली यामुळे प्रवीण चोपडेंच्या कल्याणी ने केली परिवाराची स्वप्नपूर्ती केल्याचा आनंद अकोल्यात व्यक्त होत आहे
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या