चौधरी कोचिंग क्लासेस संचालकाची 30 मे पर्यंत कोठडीत वाढ
अकोला- एका अल्पवयीन विद्यार्थिनीने रविवारी २२ मे रोजी चौधरी कोचिंग क्लासचा संचालक वसीम चौधरी याच्या विरोधात मोबाईल फोनवर अश्लील संभाषण व तिला खोलीत बोलावून असभ्य वर्तन केल्याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी वसीम चौधरीला विनयभंग आणि पॉस्कोसह विविध आरोपांखाली अटक केली. आज वसीम चौधरीला न्यायालयात हजर केले असता त्याला तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यास सांगण्यात आले होतए. आज 26 मे रोजी अकोला न्यायालयात सुनवनी झाली असता पुन्हा 30 मे पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कलम 375(3) अंतर्गत ही वाढ आज सुनावनी दरम्यान करण्यात आली आहे.
पोलीस विभागाकडून या अश्लिल सूत्रधाराविरुद्ध कडक तपास सुरू आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच काही मोठे खुलासे होऊ शकतात, अकोल्यातील पालकांनी आता सावध राहून मोठमोठ्या जाहिराती पाहून मुलांना कुठे पाठवीत आहोत याची सहनिशा करूनच कोचिंग क्लासेस ला प्रवेश द्यावा आणि अकोल्यातील नागरिकही आता सोशल मीडियावर पीडित मुलीच्या सोबत येत आहेत. तसेच चौधरी कोचिंग क्लासला नेहमीसाठी बंद करण्याची मागणी जोर धरीत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसीमने स्वतःच्या कोचिंगबाहेर मोठमोठे पोस्टर लावलेले अकोला जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी सुपर ७५ च्या नावाखाली त्याला शासकीय मदत पुरविली होती, त्या सर्व अधिकाऱ्यांनाही आता लाज वाटू लागली आहे. सुपर ७५ च्या नावाखाली हजारो विद्यार्थ्यांकडून करोडो रुपये लुटणाऱ्या या नराधमाला खडक शिक्षा ठोठावण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
0 टिप्पण्या